रविवार, ६ मार्च, २०११

आवरा आवरी..!!

आज खऱ्या अर्थाने आमच्या घरातला हिवाळा संपला. आवरा-आवरी करण्यात सकाळी आई मग्न होती. अर्धवट डोळे उघडून मी सहज विचारलं आज कोणी घरी येणार आहे का? त्याला उत्तर "नाही, हिवाळा संपला आता. उन्हाळा सुरु झालाय" असा मिळाला. आता आवरण्याचा आणि हिवाळा संपायचा काय कौतुक..मी तसेच डोळे बंद केले आणि अजून एक तास झोप काढली पण दिवस भर तसंच पडून राहणं शक्य नव्हतं.

घर आवरणे हा आमच्या आईचा छंद आणि maintencace हा नावडता शब्द आहे. नीटनेटकेपणा हा आमच्याकडे जरा ४ किलो जास्तच असतो. कधी कधी त्याचा अशक्य वैताग येतो. आज रविवार असल्याने आईचा मला पण कामाला लावायचा मानस होता. निमित्त होतं उन्हाळा सुरु झाल्याचा. जेवण झाल्यावर शांतपणे माझ्या खोली पासून सुरवात झाली. खरंतर माझ्या खोलीत आवरायला काय बाकी हा मला प्रश्न पडला होता. फक्त ३-४ गोष्टींच्या जागा बदलल्या होत्या पण त्या पूर्वीच्या जागांपेक्षा जास्त दूर नव्हत्या. पण तरीही एक भाषण मला ऐकवण्यात आलं. (करायला लागतं नाहीतर बोलण्या खायला लागतात) ह्या आवरण्याचे पण आईचे असंख्य प्रकार आहेत. रोजचे तेच तेच, पण तिला कधीही कंटाळा न येणारे. त्यांची यादी केली तर जास्त काही नवीन नाहीत त्यामुळे त्याबद्दल बोलत नाही.

maintenance हे जणु बोर्डाची परीक्षा असावी. घरात कोणताही काम निघालं, एखादी गोष्ट घायची म्हटली तरी आईच्या या परीक्षेतून त्यांना पार व्हावा लागतं. उदा:
  • शक्यतो ना फुटणारी वस्तू असावी म्हणजे साफ करताना काळजी घायला नको.
  • गुळगुळीत नसावी म्हणजे सटकायची भीती नको.
  • रंग जरा मळखाऊ असावा म्हणजे थोडी जरी मळली तर पटकन कळत नाही.
  • आणि पांढरी शुभ्र (शक्यतो कापड प्रकार) असेल तर washing machine मध्ये एकदा टाकली की direct स्वच्छ बाहेर..
अजून खूप आहेत पण हे तुमच्या आमच्या घरातले (कधी कधी डोक्याला ताप देणारे पण तेवढेच बरोबर असणारे) काही नियम.
होस्टेल ला असताना आम्ही बरीच (जास्त नाही, पण थोडी) काळजी करायचो या गोष्टींची. पण तेव्हा त्या डोक्याला भार वाटल्या नाहीत. सगळ्या गोष्टी त्यांच्या जागेवर नीट ठेवाव्यात या वाक्याचा तर आता वीट आलाय. ह्यातूनच एकदा गोड उलट बोलून एका dialogueचा जन्म झाला. आम्ही पण वस्तू आवरून ठेवतो, पण आई, तुमच्या आमच्या त्या जागा वेगळ्या असतात..!!! याला बऱ्याच लोकांनी दाद दिल्यामुळे मी उलट बोलल्याचं वाईट वाटलं नाही.

सध्या घरीच असल्याने आई आहेच ना म्हणून सोडून देते.. कपड्यांची बोचकी, वस्तूंचा पसारा, charger headphones ची गुंतागुंत हे परत घरात दिसायला लागलेत. कितीही आवरले तरी मला कधीच न सापडणाऱ्या गोष्टी सध्या लगेच मिळतात. सगळ्या डोळ्यासमोरच असतात.. पण त्या कधी खुपत नाहीत किंवा काय उगाच पडलंय असंही वाटत नाही मग त्या पसारा categary मध्ये कशा मोडतात हे मला अजून कळलं नाही अणि असलाच थोडा पसारा तर काय फरक पडतो. शेवटी आपलं आपणच शोधतो की. मला काय हा सगळ्यांचाच (आपल्या पिढीचा) प्रश्न आहे शेवटी॥

नुसता घर आवरण्यावर पण कधी एवढं लिहेन वाटलं नव्हतं.. पण आता हे पोस्ट पण आवरायला हवं नाहीतर उगाच इथे शब्दांचा पसारा होईल... (वावा .. dialogue.)

३ टिप्पण्या:

  1. मला याचा अनुभव आहे....या comments मध्ये मी या वरती एक पोस्ट लिहू शकतो.....फक्त आमच्या कडे बाबा यायच्या आधल्या दिवशी युद्ध पातळी वर अवरावरी चालू व्हायची .....;)
    नेहमी सारखे उच्च झाले आहे लिखाण...

    उत्तर द्याहटवा
  2. छान लिहिले आहे ...
    ब्लॉग चांगला आहे तुमचा

    उत्तर द्याहटवा
  3. "नीटनेटकेपणा हा आमच्याकडे जरा ४ किलो जास्तच असतो."...."होस्टेल ला असताना आम्ही बरीच (जास्त नाही, पण थोडी) काळजी करायचो या गोष्टींची."....... ."सगळ्या डोळ्यासमोरच असतात.. पण त्या कधी खुपत नाहीत किंवा काय उगाच पडलंय असंही वाटत नाही मग त्या पसारा categary मध्ये कशा मोडतात हे मला अजून कळलं नाही.'......"(वावा .. dialogue.)" ....zakas wakya aahet ...aawdya!!!!

    उत्तर द्याहटवा