शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११

एक प्रसंग आणि भाषा अभिमान....

(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)

हा प्रसंग मी दुर्गापूर(पं.बंगाल) ला नोकरी करत असताना घडला.रविवारी कामावरती मला कणकण जाणवत होती म्हणून मी कशी तरी गाडी चालवत घरी आलो आणि मेल्यासारखा झोपलो.कशी काय झोपेत कलकत्ता high way वरती गाडी चालवली रमण्या गणपतीला माहित ! जेंव्हा जाग आली तेव्हा सात वाजले होते आणि माझे तापाने बारा ! कसा तरी घरमालकाला विचारून एका डॉक्टर कडे जाऊन त्याची appointment घेतली.रात्री तसाच काही तरी खाऊन झोपलो.

सकाळी ९ वाजता बोलावले होते म्हणून जरा आधीच गेलो .पण तिकडे त्याच्या कडे appointment फक्त नावाला होती.त्याच्या स्वताच्या घरात त्याचा दवाखाना होता.हॉल मध्ये मध्ये गर्दी होती आणि तो dinning room मध्ये बसून पेशंट तपासात होता.मुख्य म्हणजे त्या घरात सगळा सिगरेट चा धूर भरून राहिला होता.(माझी passive smoking ची सवय मला कामा आली..! ).तो डॉक्टर दुर्गापूर स्टील प्लांट चा निवृत्त डॉक्टर होता.पांढरे केस आणि तो सिगरेट चा निखारा एवढीच आठवण आहे मला.तशा धुरात १ तास बसल्या वर माझी पाळी आली.तो पर्यंत मी त्या धुराने संपलो होतो.
डॉक्टर समोर गेलो आणि त्याने मला बंगाली मध्ये विचारले,"काय झालं आहे ?" मला बंगाली कळते म्हणून मी हिंदी मध्ये सांगयला लागलो .त्याने मला थांबवले आणि बंगाली मध्ये परत विचारले "गाव कुठलं ? मी पुण्याचा आहे कळल्या वर तो म्हणाला की "तू बंगाली मध्ये बोलल्या शिवाय मी तुला तपासणार नाही आणि या भागात कोणाला पण तुला तपासू देणार नाही."!

मी हादरलो ! तरी मी आपली हिंदी सोडली नाही .त्याला पटवून द्यायला लागलो की एकडे मी नवीन आहे मला बंगाली अजून बोलता येत नाही .खरं म्हणजे त्यावेळी माझ्या अंगात बोलण्या एवढी पण ताकत नव्हती.तो बोलायला लागला " मग तो राज ठाकरे मराठी भाषे ची सक्ती का करतो आहे?मी बंगाल मध्ये राहतो मी का बंगाली सोडू.?मी रोज "आजतक " वर पाहतो की कसे महाराष्ट्र मध्ये परप्रांतीयांना हल्कून देत आहे.मला पण असे आसाम मधून हल्कून दिले .येवढा मोठा डॉक्टर पण लोकांना भाषा आणि प्रांत महत्वाची !(तिकडे मी असाह्य पणे त्या सिगरेट च्या धुरात बसलो होतो!)आता मी माझ्या मुलाला पुण्यात पाठवीन का ? मला काय भरोसा की ते राज ठाकरे चे लोक त्याला मारणार नाहीत.तू देतो का भरोसा ?"
मला त्या क्षणी त्या आजतक वाल्यांना अलका च्या चौकात नेऊन मारावासे वाटले.पहिल्यांदा मी माझा मराठी चा अभिमान ताब्यात ठेवला आणि त्याला सांगितले की हे media वाले सगळी वाट लावून टाकतात ,माझे खूप बंगाली मित्रमैत्रिणी आहेत पुण्यात ,तुम्ही पण पुण्यात येऊन हॉस्पिटल ला join होऊ शकतात असं बरच काही बोललो......यात जवळ पास अर्धा तास गेला. पण त्याने बंगाली सोडले नाही पण बहुदा कंटाळून त्याने मला औषध दिले.

तो जो अर्धा तास मला माझ्या कंपनी interview पेक्षा अवघड गेला.मी नंतर बरा झालो ती गोष्ट वेगळी ! मला त्या डॉक्टर चे कौतुक वाटले की तो त्याचा भाषेचा अभिमान जपत होता पण त्याच वेळी वाटले की patient समोर असतना त्याने असे वागायला नको होते.कधी वाटले त्याने जे भोगले तसा तो वागला का media च बोलत होता त्याच्या तोंडून...
भाषेचा अभिमान मला पण आहे पण कुठे दाखवला पाहिजे याची जाणीव या प्रसंगानंतर झाली आहे ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा